Top News

विमल इलायची जाहिरात प्रकरण तापले! अजय देवगणचा FDAला सवाल; नोटीसविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव


विमल इलायची जाहिरात प्रकरण तापले! अजय देवगणचा FDAला सवाल; नोटीसविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव

मुंबई : प्रतिबंधित पान मसाल्याच्या अप्रत्यक्ष जाहिरातीवरून महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार यांच्यातील वाद आता न्यायालयाच्या दारात पोहोचला आहे. विमल इलायचीच्या जाहिरातीवरून अभिनेता अजय देवगण याला बजावण्यात आलेल्या नोटीसला त्याने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. 'नोटीस मला का पाठवली? संबंधित उत्पादन तयार करणाऱ्या कंपनीला नोटीस पाठवायला हवी होती,' असा सवाल उपस्थित करत अजय देवगणने FDAच्या कारवाईवर आक्षेप घेतला आहे.


नेमके प्रकरण काय?

 इलायचीच्या जाहिरातीच्या माध्यमातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या विमल पान मसाल्याची अप्रत्यक्ष जाहिरात केली जात असल्याचा आरोप महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने केला आहे. या प्रकरणाची दखल घेत FDAने अभिनेता अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ या तिन्ही कलाकारांना नोटिसा बजावल्या होत्या.

विमल इलायचीच्या नावाखाली प्रत्यक्षात पान मसाल्याच्या ब्रँडचा प्रचार केला जात असल्याचा FDAचा आक्षेप आहे. प्रतिबंधित उत्पादनांची थेट किंवा अप्रत्यक्ष जाहिरात करून ग्राहकांपर्यंत त्यांचा प्रचार पोहोचवला जात असल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, अशी प्रशासनाची भूमिका आहे.

अजय देवगणचा न्यायालयात काय युक्तिवाद?

FDAच्या नोटिशीविरोधात अजय देवगणने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्याने आपली भूमिका स्पष्ट करताना आपण संबंधित जाहिरातीत केवळ कलाकार म्हणून सहभागी झालो होतो, असे म्हटले आहे.

जाहिरातीतील उत्पादनाची निर्मिती, विक्री, वितरण किंवा जाहिरातीमागील व्यावसायिक निर्णयांशी आपला थेट संबंध नसताना आपल्याला नोटीस बजावणे योग्य नाही, असा युक्तिवाद त्याच्याकडून करण्यात आल्याचे वृत्त आहे.

तसेच, संबंधित उत्पादन कंपनीकडे जबाबदारी निश्चित करण्याऐवजी थेट कलाकारांना लक्ष्य करणे मनमानी असल्याचा आक्षेपही याचिकेत घेण्यात आला आहे. त्यामुळे आता न्यायालय या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे मनोरंजन विश्वासह जाहिरात क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

तुकाराम मुंढेंच्या FDAची विभागीय चौकशी पूर्ण

या संपूर्ण प्रकरणात FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाने कारवाईची प्रक्रिया पुढे नेली आहे. अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्याविरोधातील विभागीय चौकशी पूर्ण झाल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे.

चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढील निर्णयासाठी संबंधित प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रशासनाकडून पुढे कोणती भूमिका घेतली जाते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

अजय देवगणने दाखल केलेल्या याचिकेवर ४ नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. या सुनावणीमध्ये FDAच्या नोटिशीची कायदेशीर वैधता, जाहिरातीत सहभागी असलेल्या कलाकारांची जबाबदारी आणि जाहिरातदार कंपनीची भूमिका यासारखे मुद्दे महत्त्वाचे ठरू शकतात.


न्यायालयाच्या भूमिकेमुळे भविष्यात प्रतिबंधित किंवा वादग्रस्त उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटींच्या जबाबदारीबाबत मह

Post a Comment

Previous Post Next Post