Top News

पुणे पदवीधरमध्ये हर्षदा जाधव-देशमुख यांची बाजी; भाजपच्या स्मिता जाधव यांचा ९,९२८ मतांनी पराभव!


पुणे पदवीधरमध्ये हर्षदा जाधव-देशमुख यांची बाजी; भाजपच्या स्मिता जाधव यांचा ९,९२८ मतांनी पराभव!

जन प्रतिसाद एक्सप्रेस | पुणे

पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा जाधव-देशमुख यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांचा ९ हजार ९२८ मतांनी पराभव केला. या निकालामुळे पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपला धक्का बसला असून, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व कायम राखले आहे.


४४ व्या बाद फेरीत विजयावर शिक्कामोर्तब

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी २७ ऑक्टोबरपासून सुरू झालेली मतमोजणी २८ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक असलेला मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे कमी मते मिळालेल्या उमेदवारांना बाद करून त्यांच्या मतपत्रिकांवरील पुढील पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात आली.

अखेर ४४ व्या बाद फेरीत हर्षदा जाधव-देशमुख यांनी विजयाचा कोटा पूर्ण केला आणि त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

दोन्ही उमेदवारांना मिळालेली मते

हर्षदा जाधव-देशमुख यांना एकूण १ लाख १३ हजार ८४० मते, तर भाजपच्या डॉ. स्मिता जाधव यांना १ लाख ३ हजार ९१२ मते मिळाली. दोघींमधील मतांचे अंतर ९ हजार ९२८ इतके राहिले.


या निवडणुकीत भाजपने विजयासाठी जोरदार तयारी केली होती. मात्र, अंतिम निकालात हर्षदा जाधव-देशमुख यांनी बाजी मारली. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने या निकालाला महत्त्व प्राप्त झाले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post