Top News

पैलवान. सोहम रिसवडे यांची भाजप विद्यार्थी आघाडीच्या सांगली जिल्हा सरचिटणीसपदी निवड!

 पैलवान सोहम

 रिसवडे यांची

 भाजप विद्यार्थी

 आघाडीच्या

 सांगली जिल्हा

 सरचिटणीसपदी

 निवड!

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान; संभाजी भिडे गुरुजी आणि पैलवान पृथ्वीराज पवार पैलवान.गौतम पवार यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा.

सांगली | रितेश तांदळे :जन प्रतिसाद एक्सप्रेस

सांगली : लहानपणापासून समाजकारण आणि राजकारणाची आवड जोपासत युवकांशी नाळ जोडणारे पैलवान सोहम रिसवडे यांची भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडीच्या सांगली जिल्हा सरचिटणीसपदी निवड झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. 


या निवडीमुळे पै.सोहम रिसवडे यांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीला नवी दिशा मिळाली असून, त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

लहानपणापासूनच समाजकारणाची आवड!

पै.सोहम रिसवडे यांना लहानपणापासूनच समाजकारण आणि राजकारणाची आवड आहे. समाजातील विविध घटकांशी संपर्क ठेवत सामाजिक क्षेत्रातील घडामोडी जाणून घेण्याची आणि सार्वजनिक जीवनात सक्रिय राहण्याची त्यांची ओढ राहिली आहे. लहान वयापासूनच त्यांनी विविध मान्यवरांच्या सहवासातून सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रातील अनुभव घेतल्याचे सांगितले जाते.

पै.सोहम रिसवडे हे लहानपणापासून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या संपर्कात राहिले आहेत. तसेच कुस्ती क्षेत्रातील पैलवान पृथ्वीराज पै.पवार गौतम पवार यांच्याशीही त्यांचा लहानपणापासून संपर्क राहिला आहे. या तिन्ही मान्यवरांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा त्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येते. समाजकारणाची आवड,  आणि राजकीय संघटनात्मक कार्याची दिशा यांचा संगम त्यांच्या पुढील वाटचालीत महत्त्वाचा ठरणार आहे.

भाजप विद्यार्थी आघाडीचे जिल्हा सरचिटणीस!

सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख निर्माण केलेल्या पै.सोहम रिसवडे यांच्यावर आता भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडीच्या जिल्हा सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न, युवकांचे संघटन, सामाजिक उपक्रम आणि पक्षाची संघटनात्मक बांधणी यामध्ये सक्रिय योगदान देण्याची संधी त्यांना या पदाच्या माध्यमातून मिळणार आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी आमदार सुरेशभाऊ खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, पै. पृथ्वीराज भैय्या पवार शुभम चव्हाण भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी सांगली शहर जिल्हाध्यक्ष आयुष देसाई व शुभम देसाई शुभम कदम नगरसेवक विश्वजीत पाटील नगरसेवक उदय बेलवलकर रवींद्र वादवने विजय साळुंखे शरद लाड, मकरंद देशपांडे, माजी आमदार दिनकर पाटील, निताताई केळकर, सुरेश आवटी, भाजप सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग आणि सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

युवकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आव्हान!

जिल्हा सरचिटणीसपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर विद्यार्थी आणि युवकांशी संवाद वाढविणे, त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे आणि सामाजिक कार्याला संघटनात्मक बळ देणे, अशी अपेक्षा त्यांच्या पुढील वाटचालीत महत्त्वाची ठरणार आहे. लहानपणापासून जोपासलेली समाजकारणाची आवड, कुस्ती क्षेत्रातील पार्श्वभूमी आणि मान्यवरांचा सहवास यांच्या बळावर पै.सोहम रिसवडे जिल्ह्यातील विद्यार्थी व युवकांमध्ये आपली भूमिका अधिक प्रभावीपणे मांडतील का, याकडे लक्ष लागले आहे.


जन प्रतिसाद एक्सप्रेस | सांगली

Post a Comment

Previous Post Next Post