हेरलेत पावसाच्या पाण्यावरून वाद; झटापटीत ५७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
हातकणंगले | प्रतिनिधी
हेरले (ता. हातकणंगले) येथे पावसाचे पाणी वळवण्याच्या कारणावरून शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर झटापटीत झाले. या घटनेत मनोहर आनंदा लोहार (वय ५७) यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पावसाचे पाणी घरासमोर व परिसरात साचत असल्याच्या कारणावरून हा वाद सुरू झाला. लोहार हे पाणी बाजूला करण्याचा प्रयत्न करत असताना शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत त्यांचा वाद झाला. त्यानंतर झालेल्या झटापटीत लोहार यांची प्रकृती बिघडली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणातील संशयित व्यक्ती पोलिसांसमोर हजर झाल्याची माहिती असून, घटनेमागील नेमके कारण आणि परिस्थितीचा पोलीस तपास करत आहेत.
पावसाच्या पाण्याच्या किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद थेट मृत्यूपर्यंत पोहोचल्याने हेरले परिसरात खळबळ उडाली आहे.
Post a Comment