कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीत २१ फुटांची गणेशमूर्ती कोसळली
(जन प्रतिसाद )कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोल्हापुरातील गोखले कॉलेज चौक परिसरात मोठी दुर्घटना घडली. वाय. पी. पोवार नगर येथील मंडळाची सुमारे २१ फूट उंच गणेशमूर्ती मिरवणुकीदरम्यान अचानक कोसळली.
प्राथमिक माहितीनुसार, मिरवणुकीदरम्यान मूर्तीचा विद्युत तारेला स्पर्श झाल्यानंतर तिचा तोल गेला आणि मूर्ती रस्त्यावर कोसळली. या घटनेमुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर संबंधित यंत्रणांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीदरम्यान रस्त्यावर कोसळलेली २१ फुटांची गणेशमूर्ती.
Post a Comment