उशिरा का होईना, शासनाने दुष्काळाचा निर्णय घेतला सुप्रिया सुळे यांची दुष्काळावर प्रतिक्रिया
मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रतिक्रिया व्यक्त केली.
“उशिरा का होईना, सरकार ने दुष्काळाचा निर्णय घेतला” अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या निर्णयावर भाष्य केल्याचे सांगितले जात आहे. दुष्काळ जाहीर करण्याबरोबरच शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आणि तातडीची मदत मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत आणि दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना शासनाकडून ठोस मदत मिळावी,
शासनाने संकोच न करता शेतकऱ्यांच्या साठी तिजोरी उघडी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. दुष्काळाच्या प्रश्नावर राजकारण न करता शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याला प्राधान्य दिले पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे.
दरम्यान, सरकारच्या दुष्काळी उपाययोजनांकडे आता शेतकरी आणि विरोधकांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment