4 ऑक्टोबरच्या महामोर्चासाठी संजय राऊत यांच्या कडून अभिजित दीपके यांनाही आवाहन; ठाकरे बंधूंच्या आंदोलनाला CJPचा पाठिंबा मिळणार काय ❓
मुंबई : मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षणाच्या (SIR) मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत संयुक्त जनमोर्चाची घोषणा केली आहे. या मोर्चात विविध राजकीय पक्ष आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांनीही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलनाची भूमिका घेतली आहे. 2 ऑक्टोबरच्या CJP आंदोलनाला शिवसेना (UBT)ने पाठिंबा दिल्याचे वृत्त आहे. आदित्य ठाकरे यांनीही 2 ऑक्टोबरच्या आंदोलनाबाबत सोशल मीडियावरून भूमिका मांडली असून, त्याला दीपके यांनी प्रतिसाद देत आभार मानले आहेत.
दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी 4 ऑक्टोबरचा मोर्चा केवळ दोन पक्षांपुरता मर्यादित न ठेवता सर्व राजकीय पक्ष आणि नागरिकांचा जनमोर्चा करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे CJPचे अभिजीत दीपके या मोर्चात सहभागी होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मोर्चाचे अचूक ठिकाण आणि वेळ अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. आयोजकांकडून पुढील माहिती लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
Post a Comment