Top News

पोलीस उपनिरीक्षक किसन भोईर यांच्यावर हल्ला; डोक्यात वीट घालून संपवलं, घटनेने ठाणे संपूर्ण हादरलं.

ठाणे हादरले! कर्तव्य बजावणाऱ्या PSI वर प्राणघातक हल्ला; सिमेंटची वीट डोक्यात घालून हत्या
ठाणे | प्रतिनिधी
ठाणे शहरात कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
 चितळसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक (PSI) किसन भोईर (वय 56) यांच्यावर गस्तीदरम्यान प्राणघातक हल्ला करण्यात आला.
 डोक्यात सिमेंटची वीट मारल्याने गंभीर जखमी झालेल्या भोईर यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, 24 सप्टेंबरच्या रात्री पोखरण रोड क्रमांक 2 परिसरात गणपती बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर PSI भोईर हे सहकाऱ्यांसह गस्त घालत होते. एका पानटपरीजवळ गोंधळ सुरू असल्याचे दिसल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला. यावेळी राजू प्रेमकुमार वाल्मिकी याच्याशी पोलिसांची बाचाबाची झाली. पोलिसांनी त्याला वाहनातून पोलीस ठाण्याकडे नेण्याचा प्रयत्न केला असता तो वाहनातून उतरून पळाला. भोईर यांनी त्याचा पाठलाग केला.
पळून जात असताना आरोपीने जवळ पडलेली सिमेंटची वीट उचलून भोईर यांच्या डोक्याच्या मागील बाजूस जोरदार प्रहार केल्याचे पोलिसांनी सांगितले. 
भोईर खाली कोसळल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी चितळसर पोलिसांनी खुनासह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post