Top News

पुणे शिक्षक मतदारसंघात अभिजीत बिचुकले यांना जोरदार धक्का केवळ १९ मते; निवडणुकीतील आव्हान संपुष्टात


पुणे शिक्षक मतदारसंघात अभिजीत बिचुकले यांना  जोरदार धक्का केवळ १९ मते; निवडणुकीतील आव्हान संपुष्टात

पुणे : बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांना पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अवघी १९ मते मिळाल्याची माहिती समोर आली आहे. मतमोजणीदरम्यान त्यांना मिळालेल्या मतांच्या आधारे त्यांचे या निवडणुकीतील आव्हान संपुष्टात आले.
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण ३० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीत अभिजीत बिचुकले यांनीही आपले नशीब आजमावले होते. मात्र, त्यांना केवळ १९ मतांवर समाधान मानावे लागले.
दरम्यान, बिचुकले यांनी पुणे शिक्षक मतदारसंघासोबतच पुणे पदवीधर मतदारसंघातूनही निवडणूक लढवली आहे. त्यामुळे शिक्षक मतदारसंघातील कामगिरीनंतर आता पदवीधर मतदारसंघात त्यांना किती मते मिळतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
जन प्रतिसाद एक्सप्रेस

Post a Comment

Previous Post Next Post