Top News

नांद्रेत उद्या राजू शेट्टींची ऊस परिषद; उसाला एकरकमी ५ हजार रुपये दराची मागणी




नांद्रेत उद्या राजू शेट्टींची ऊस परिषद; उसाला एकरकमी ५ हजार रुपये दराची मागणी

नांद्रे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत उद्या, ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता वीराचार्य चौक, नांद्रे येथे ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.


चालू गळीत हंगामातील उसाला एकरकमी प्रतिटन ५ हजार रुपये दर मिळावा, ही प्रमुख मागणी या परिषदेत मांडण्यात येणार आहे. वाढता उत्पादन खर्च, खते, औषधे, मजुरी, ऊस तोडणी व वाहतूक खर्च यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

याशिवाय कर्जमाफीची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तातडीने जमा करण्यात यावी, हा महत्त्वाचा मुद्दाही परिषदेत मांडण्यात येणार आहे. कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी होणारा विलंब दूर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येणार आहे.

ऊसदर आणि कर्जमाफी या प्रमुख प्रश्नांसह शेतकऱ्यांच्या विविध अडचणींवर परिषदेत चर्चा होणार आहे. राजू शेट्टी या प्रश्नांवर कोणती भूमिका मांडतात आणि आगामी काळातील आंदोलनाची दिशा काय ठरवतात, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

परिषदेचे ठिकाण : वीराचार्य चौक, नांद्रे दिनांक : ६ ऑक्टोबर २०२६ वेळ : सायंकाळी ६ वाजता प्रमुख उपस्थिती : राजू शेट्टी

जन प्रतिसाद एक्सप्रेस शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य


Post a Comment

Previous Post Next Post