Top News

शेतकऱ्यांचा एल्गार; ५ ऑक्टोबरला तहसील कार्यालयावर मोर्चा

शेतकऱ्यांचा एल्गार; ५ ऑक्टोबरला तहसील कार्यालयावर मोर्चा

आटपाडी : तालुक्यातील पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून शेती आणि पशुधनावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. पाण्याअभावी पिके वाळू लागली असून जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच शेतीपंपांना होणारा खंडित वीजपुरवठा शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवत आहे.


या पार्श्वभूमीवर पाणी संघर्ष चळवळीच्या वतीने ५ ऑक्टोबर रोजी आटपाडी तहसील कार्यालयावर शेतकरी मोर्चा काढण्यात येणार आहे. पाणीप्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी या मोर्चातून केली जाणार आहे.


पाणीटंचाईमुळे शेतीचे नुकसान होत असताना पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी व चारा आणि शेतीपंपांसाठी सुरळीत वीजपुरवठा हे प्रश्नही ऐरणीवर आले आहेत. त्यामुळे प्रशासन या आंदोलनाची कशी दखल घेते, याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post