‘पूर्ण मुंब्रा हिरवा
करणाऱ्यां( कैसे
हराया फेम) सहर
शेख यांच्या
वडिलांच्या हातात
भगवा!
राजकीय चर्चेला
उधाण
मुंब्रा : प्रतिनिधी
एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांच्या ‘कैसे हरायाsssss…’ या वक्तव्यामुळे चर्चेत आलेल्या मुंब्र्यात आता त्यांच्या वडिलांच्या नियुक्तीची चर्चा रंगली आहे. ‘पूर्ण मुंब्रा हिरवा करणाऱ्यांच्या हातात भगवा!’ या बोचऱ्या शब्दांत या राजकीय घडामोडीकडे पाहिले जात आहे.
सहर शेख यांचे वडील युनूस शेख यांची शिवसेनेशी संबंधित अखिल भारतीय केबल सेनेच्या कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे मुंब्र्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना नवे वळण मिळाले आहे.
मात्र, युनूस शेख यांनी आपण शिवसेनेत औपचारिक प्रवेश केलेला नसल्याचे सांगितल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. ही नियुक्ती केबल आणि इंटरनेट व्यवसायाशी संबंधित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केल्याचे वृत्तांत नमूद आहे.
त्यामुळे या घडामोडीला राजकीय पक्षप्रवेशाचा रंग देण्यापूर्वी अधिकृत भूमिका स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे. सध्या मात्र ‘पूर्ण मुंब्रा हिरवा करणाऱ्यांच्या हातात भगवा!’ हा चर्चेचा विषय ठरत आहे.
Post a Comment