Top News

इचलकरंजीत बनावट चहा पावडर निर्मितीचा पर्दाफाश; १० लाखांचा मुद्देमाल जप्त

इचलकरंजीत बनावट चहा पावडर निर्मितीचा पर्दाफाश; १० लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : इचलकरंजीजवळील पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये बनावट चहा पावडर तयार करून ब्रँडेड कंपनीच्या नावाचा कथित गैरवापर होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
 आय.पी. इन्व्हेस्टिगेशन अ‍ॅण्ड डिटेक्टिव्ह सर्व्हिसेसच्या पथकाने केलेल्या कारवाईत सुमारे १० लाख ४ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये २५० ग्रॅम पॅकिंगची ५४ पोती, ५०० ग्रॅमचे २० पाऊच, पॅकिंग मशीन, शिलाई मशीन आणि वजनकाटा यांचा समावेश आहे. संबंधित ठिकाणी लोबोसा फूड अ‍ॅण्ड बेव्हरेजेस कंपनीच्या कॉपीराइटचा कथित गैरवापर करून चहा पावडर तयार केली जात असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भिकुदास रामचंद्र मांडवकर

 यांच्याविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात कॉपीराइट अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, बाजारात अशा प्रकारे बनावट उत्पादनांचा पुरवठा होत आहे का, याबाबतही तपास सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post