Top News

बैलगाडीतून एन्ट्री; गोपीचंद पडळकरांचा जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्जसमर्थकांची मोठी गर्दी; घोषणाबाजीने परिसर दणाणला



बैलगाडीतून एन्ट्री; गोपीचंद पडळकरांचा जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज
समर्थकांची मोठी गर्दी; घोषणाबाजीने परिसर दणाणला

सांगली | प्रतिनिधी
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस रंगतदार होत असताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज अनोख्या पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
 पडळकर बैलगाडीतून निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडे दाखल झाले. त्यांच्या या प्रवेशाची जिल्हाभरात चर्चा सुरू झाली आहे.
पडळकर यांच्या बैलगाडी मिरवणुकीत समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. हातात चाबूक घेत बैलगाडीतून आलेल्या पडळकरांचे समर्थकांनी घोषणाबाजी करत स्वागत केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.
पडळकर यांनी जत तालुका विकास सोसायटी गटातून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. यावेळी आमदार सदाभाऊ खोत, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हा बँक ही शेतकरी आणि सहकार क्षेत्राशी जोडलेली महत्त्वाची संस्था असल्याचे सांगत पडळकर यांनी बँकेच्या कारभाराबाबत आपली भूमिका मांडली. शेतकऱ्यांना कर्जपुरवठा, मोठ्या कर्जखात्यांचा प्रश्न तसेच बँकेतील कथित आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी यासंदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
दरम्यान, अर्ज दाखल करण्याच्या वेळी परिसरात पडळकर समर्थकांकडून जयंत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी झाल्याचेही वृत्त आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय वातावरण आणखी तापले आहे.
आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोणती राजकीय समीकरणे आकार घेतात, कोणते पॅनेल एकत्र येतात आणि मतदार कोणाला साथ देतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post