Top News

कोल्हापूर जिल्ह्यातील सहा तालुके दुष्काळग्रस्त शासनाच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांना दिलासा; राधानगरी-गगनबावड्याच्या समावेशाने चर्चेला उधाण

कोल्हापूर जिल्ह्यातील सहा तालुके दुष्काळग्रस्त
शासनाच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांना दिलासा; राधानगरी-गगनबावड्याच्या समावेशाने चर्चेला उधाण

कोल्हापूर : राज्य शासनाने दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा आणि चंदगड या सहा तालुक्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे संबंधित तालुक्यांतील शेतकऱ्यांना शासनाच्या दुष्काळ निवारणाच्या विविध उपाययोजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खरीप हंगामातील पिकांची स्थिती, पर्जन्यमानातील तफावत आणि उपलब्ध जलसाठ्याचा विचार करून दुष्काळी परिस्थिती निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, राधानगरी आणि गगनबावडा या तुलनेने अधिक पावसाच्या तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाल्याने या निर्णयाबाबत जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे शिरोळ आणि हातकणंगले या तालुक्यांचा यादीत समावेश नसल्याने स्थानिक पातळीवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी शासनाकडून कोणत्या उपाययोजना लागू होणार, शेतकऱ्यांना कोणत्या सवलती मिळणार आणि प्रत्यक्ष मदत कधी मिळणार, याकडे आता शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post