Top News

कोल्हापूरच्या संघर्ष मोर्चात लक्षवेधी आकर्षण! भव्य कोल्हापुरी चपलेची प्रतिकृती मोर्चात सहभागी


कोल्हापूर : कोल्हापुरातील गोकुळच्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर आज, ९ नोव्हेंबर रोजी संघर्ष मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चामध्ये सहभागी झालेली कोल्हापुरी चपलेची भव्य प्रतिकृती विशेष आकर्षणाचा विषय ठरली.


कोल्हापूरची ओळख असलेल्या पारंपरिक कोल्हापुरी चपलेची प्रतिकृती मोर्चात सहभागी करण्यात आल्याने उपस्थितांचे लक्ष वेधले गेले. कोल्हापूरची सांस्कृतिक ओळख, परंपरा आणि स्थानिक अस्मितेचे प्रतीक असलेल्या या चपलेच्या प्रतिकृतीची मोर्चात चर्चा रंगली.

गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षावरून राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकाराने हा संघर्ष मोर्चा काढण्यात आला. दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या या मोर्चात विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, शेतकरी आणि नागरिक सहभागी झाले.


कोल्हापूरच्या राजकीय संघर्षाबरोबरच शहराच्या वैशिष्ट्यपूर्ण ओळखीचे दर्शन घडवणारी कोल्हापुरी चपलेची प्रतिकृती हे या मोर्चातील वेगळे आकर्षण ठरले.

जन प्रतिसाद एक्सप्रेस | कोल्हापूर

Post a Comment

Previous Post Next Post