Top News

सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रामतीर्थ घाटाला भेट; देवीमातेचे घेतले दर्शन!


सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रामतीर्थ घाटाला भेट; देवीमातेचे घेतले दर्शन!

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे आगामी सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथील गोदावरी नदीच्या पवित्र रामतीर्थ घाटाला भेट दिली. यावेळी त्यांनी देवीमातेचे मनोभावे पूजन करून दर्शन घेतले आणि आशीर्वाद प्राप्त केले.


श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचा अनोखा संगम असलेल्या या पवित्र तीर्थक्षेत्रात मुख्यमंत्री फडणवीस यांनी आगामी सिंहस्थ महाकुंभमेळ्याचे आयोजन मंगलमय, निर्विघ्न आणि यशस्वी व्हावे, यासाठी प्रार्थना केली.


नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळा हा देशभरातील भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचा धार्मिक सोहळा मानला जातो. या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीचे धार्मिक महत्त्व आणि रामतीर्थ घाटाचे स्थान विशेष आहे.


 महाकुंभमेळ्याच्या आयोजनासाठी प्रशासनाकडून विविध तयारी केली जात असताना मुख्यमंत्र्यांच्या या धार्मिक भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.


जन प्रतिसाद एक्सप्रेस बातमी जनहिताची, भूमिका जनतेची!

Post a Comment

Previous Post Next Post