Top News

शिराळ्यात बिबट्याची दहशत; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण येळापूर परिसरातील चव्हाणवाडीत बिबट्याचे दर्शन; मांजराची शिकार केल्याची माहिती

शिराळ्यात बिबट्याची दहशत; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
येळापूर परिसरातील चव्हाणवाडीत बिबट्याचे दर्शन; मांजराची शिकार केल्याची माहिती

शिराळा | जनप्रतिसाद प्रतिनिधी
शिराळा तालुक्यातील येळापूर परिसरातील चव्हाणवाडी येथे बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात बिबट्या दिसून आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली असून, एका मांजराची शिकार झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून परिसरातील नागरिक आणि शेतकरी रात्रीच्या वेळी सावधगिरी बाळगत आहेत. शेतीच्या कामासाठी तसेच जनावरांची देखभाल करण्यासाठी रात्रीच्या वेळी बाहेर पडताना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वनविभागाने पाहणी करून उपाययोजना कराव्यात
बिबट्याचा वावर नेमका कोणत्या भागात आहे, याचा शोध घेण्यासाठी वनविभागाने परिसराची पाहणी करावी. आवश्यक त्या ठिकाणी कॅमेरे किंवा पिंजरे लावून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
दरम्यान, नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकट्याने शेताकडे जाऊ नये आणि बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post