रिपब्लिकन पक्षाचा येत्या दि.3 ऑक्टोबर रोजी 69 वा वर्धापन दिन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहा- सिद्धार्थ कासारे
मुंबई दि.28 - महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना दिनांक 3 ऑक्टोबर 1957 रोजी नागपूर येथे झाली होती. यंदा रिपब्लिकन पक्षाचा 69 वा वर्धापन दिन सोहळा येत्या 3 ऑक्टोबर रोजी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात नवी मुंबई येथील विष्णुदास भावे सभागृह येथे आयोजित करण्यात आलेला आहे.या सोहळ्यास मुंबईतील आंबेडकरी जनतेने रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत केले.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात दरवर्षी दिनांक 3 ऑक्टोबर ला रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा केला जातो.यंदाही 3 ऑक्टोबर ला नवी मुंबईत रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन सोहळा ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वात साजरा होणार आहे.
या सोहळ्यास मुंबईतून हजारो च्या संख्येने रिपब्लिकन जनता उपस्थित राहणार असल्याची माहिती आज रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी दिली.
Post a Comment