Top News

सांगली जिल्हा हादरला! आई आणि दोन वर्षांच्या चिमुकल्याचा विहिरीत मृत्यू; देशिंग येथील


सांगली जिल्हा हादरला!

 आई आणि दोन वर्षांच्या

 चिमुकल्याचा विहिरीत

 मृत्यू; देशिंग येथील

 हृदयद्रावक घटना


कवठेमहांकाळ : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग येथील देसाई वस्तीवर आई आणि दोन वर्षांच्या चिमुकल्या मुलाचा विहिरीत मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रीती मनोहर राठोड (वय २५) आणि त्यांचा दोन वर्षांचा मुलगा श्रीहन अशी मृतांची नावे आहेत. शनिवारी दुपारपासून बेपत्ता असलेल्या मायलेकाचा रविवारी सकाळी दुर्दैवी अंत झाल्याचे समोर आले.
मिळालेल्या माहितीनुसार,
 कर्नाटकातील विजापूर परिसरातून राठोड कुटुंब ऊसतोडणीच्या कामासाठी देशिंग येथे आले होते. शनिवारी कुटुंबात काही कारणावरून वाद झाल्यानंतर प्रीती या आपल्या दोन वर्षांच्या मुलाला घेऊन घरातून बाहेर पडल्या. बराच वेळ उलटूनही त्या परत न आल्याने कुटुंबीय आणि नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. मात्र, रात्र होऊनही मायलेकाचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.
दरम्यान, रविवारी सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास नंदकुमार घोरपडे यांच्या मालकीच्या विहिरीत महिलेची चप्पल पाण्यावर तरंगताना दिसून आली. त्यामुळे संशय निर्माण झाल्याने विहिरीत शोध घेण्यात आला. त्यावेळी प्रीती आणि त्यांचा चिमुकला मुलगा विहिरीच्या पाण्यात आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच सांगली स्पेशल रेस्क्यू टीम आणि आपत्कालीन बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. सुमारे ७० फूट खोल आणि जवळपास ३० फूट पाणी असलेल्या विहिरीतून अत्यंत प्रयत्नांनंतर दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले.
या घटनेमुळे राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून देशिंग परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आई आणि चिमुकल्या मुलाचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याबाबत अद्याप अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू असून मृत्यूमागील नेमकी परिस्थिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
दोन दिवसांपूर्वीपर्यंत कुटुंबासोबत असलेले मायलेक अचानक काळाच्या

Post a Comment

Previous Post Next Post